लाडकी बहिण योजनेतून अपात्र नावे वगळण्यास सुरुवात
मुंबई । प्रतिनिधी
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पडताळणी करण्यास सरकारने सुरु केली आहे. यामुळे या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची नावे वगळण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पडताळणीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात झाली असून यामध्ये चार चाकी गाडी असणाऱ्या अपात्र बहिण्ींची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केली असून या योजनेमध्ये आधी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर पडताळणीला सुरूवात झाल्याने काही अपात्र बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झाली आहे. या योजनेच्या लाभार्थी असलेल्या बहिणींच्या घरी चारचाकी असलेल्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यानुसार अपात्र बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली आहे.