कैलास फडसह पाच जणांना गुन्हा दाखल
बीड । प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये एका मतदान केंद्रावर गोंधळ घातल्या प्रकरणी कैलास फडसह पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीत परळीमधील एका मतदान केंद्रावर कैलास फड यांनी गोंधळ घातला होता. एवढेच नाही तर शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला यांना कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत मध्ये कोणीही जायचं नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आलं होतं. नेते माधव जाधव यांनाही मारहाण करण्यात आली होती. या सर्व प्रकाराचा एक िव्हडीओ व्हायरल झाला होता. या प्रकाराला अडीच महिने झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.