व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट; दोन जणांना अटक

0

मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवत अटक केली आहे.

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दोघांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. या प्रकरणी आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतरच पोलिसांनी कारवाई करत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.याप्रकरणी आकाश दिगंबर डाळवे (वय 30, रा. यावळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले . तर अविनाश बापू पुकळे (वय 30, रा. पारे कोकरेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला उरळी कांचन, जि. पुणे येथून बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपींना आज गिरगाव येथील 18 व्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.