व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला मिळणार संधी

0

मुंबई । प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार असून प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका केव्हाही लागू शकतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमध्ये हायकमांडकडून फेरबदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रदेशध्यक्षपदसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित देशमुख आणि हर्षवर्धन सपकाळ या नावांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सध्या ज्या नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू आहे, त्यावरू असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात पक्षाकडून एखाद्या तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.