अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण
मुंबई । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काल झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत ते दोषी नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाईही नाही असे उपमुख्यमंत्री अिजत पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक करांड यांच्याशी असलेले हितसंबंध, कृषी घोटाळा, करुण मुंडे या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजुंनी आरोप केले जात आहेत. विरोधकांनीही मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. दरम्यान या प्रकरणात पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.