उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर लँड होताच उडाले ड्रोन
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक येथे दाखल झाले. शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर लँड होतात एक ड्रोन उडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी ड्रोन उडविणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्याची संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी शिंदे यांचे हेलिकॉप्टर नाशिक येथे प्लॅन झाल्यावर अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडविल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतली असून त्याची चौकशी सुरू आहे. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.