सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड l प्रतिनिधी
मस्साजोग सरपंच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेला आरोपी सुदर्शन घुले यास आज केज न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. घुले याची ल जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी अटकत असलेला आरोपी सुदर्शन घुले याच्यावर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. खंडणी प्रकरणी केज न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही मुदत संपल्याने त्याला पुन्हा केज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात असून केस न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांनी घुले यांच्या आवाजाचे नमुने घेतली आहेत. यामुळे घुले याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सुदर्शन घुले याला बीड जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे.