राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर ग्रुप मध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश
मुंबई l प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत दोषी नाहीत असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा अभय दिले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोअर ग्रुपची स्थापना करण्यात आली असून यात धनंजय मुंडे यांना समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडे यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, कृषी घोटाळा, करुणा मुंडे याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. विरोधकांनी त्यांच्या राजीनामाची मागणी लावून धरत दबाव निर्माण केला. मात्र पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी एक नव्हे तर दोन धनंजय मुंडे यांची पाठराखण करत याप्रकरणी धनंजय मुंडे दोषी सिद्ध झाल्यावर कारवाई करू असे सांगितले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या कोर ग्रुपमध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंडे यांच्यासह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.