राजकारण आणि सत्तेच्या आहारी जाऊन धस यांनी दगाफटका केला : मनोज जरांगे
जालना l प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली याबाबत कळाले. ही भेट दुर्दैवी असून आमदार धस यांनी राजकारण व सत्तेच्या आहारी जाऊन समाजासोबत दगा फटका केला अशी प्रतिक्रिया मराठा युद्ध मनोज जरांगे यांनी दिली.
जरांगे म्हणाली की धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती मला कळाली. ही भेट झाली असेल तर फार धक्कादायक आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. समाज बांधवांनी धस यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता. ज्या माणसाने समाज बांधवांचा खून केला त्याची आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली यावर मला विश्वासच बसत नाही असेही जरांगे म्हणाले.