व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अन् फरक अनुदान द्या

खा.बजरंग सोनवणेंचे केंद्रीय कृषीमंत्री, वाणज्यि मंत्र्यांना पत्र

0

बीड । प्रतिनिधी
नोंदणीकृत खरेदी पूर्ण होण्यापूर्वीच नाफेड खरेदी केंद्रे बंद झाल्यामुळे बीड जल्ह्यिातील सोयाबीन शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या नर्मिाण झाली आहे. सोयाबीन खरेदी कालावधी वाढवावी आणि भावान्तर योजने अंतर्गत किमतीतील फरक अनुदान स्वरुरात सोयाबीन उत्पादक शेतक-यांना देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र शेतकरीपुत्र खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय कृषीमंत्री आणि वाणज्यि मंत्री यांना दिले आहे.

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहाण व वाणज्यि मंत्री पियुष गोयल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, बीड जल्ह्यिात १ ऑक्टोबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान ४४,४७४ सोयाबीन शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत त्यांचे उत्पादन विकण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी ३० केंद्रांद्वारे खरेदी प्रक्रिया सुरू झाली आणि ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू राहिली. दुर्दैवाने, या कालावधीत केवळ २०,१६९ शेतकऱ्यांना ५,१४,२०२ क्विं टल सोयाबीन विकता आले. आर्द्रतेचे कारणाने बरेच सोयाबीन परत पाठवण्यिात आले. खरेदी केंद्रे लवकर बंद झाल्यामुळे २३,२७५ नोंदणीकृत शेतकरी खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. परिणामी, या शेतकऱ्यांना आता त्यांचे उत्पादन खुल्या बाजारात खूपच कमी किमतीत विकावे लागत आहे. जल्ह्यिातील सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतातुर आहे. ही परस्थितिी लक्षात घेता, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व नोंदणीकृत शेतकरी त्यांचे उत्पादन नाफेडला विकू शकतील, तोपर्यंत सोयाबीन खरेदीचा कालावधी वाढवा. उत्पादन खर्च आणि सध्याच्या बाजारातील परस्थितिी लक्षात घेता, वक्रिी किंमत ४,८९२ प्रति क्विं टल वरून ६,००० प्रति क्विंटल पर्यंत वाढवण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांना नाफेड मार्फत त्यांचे सोयाबीन विकता आले नाही, त्यांना भावांतर योजनेअंतर्गत भावातील फरक अनुदानस्वरुपात द्यावा, जेणेकरून त्यांचे कमी आर्थिक नुकसान होईल, विशेषत: उच्च आर्द्रता आणि प्रतिकूल हवामानाचा परिणाम लक्षात घेता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळेल, असेही पत्रात म्हटले आहे. शेतकरी पुत्र असलेले खा.बजरंग सोनवणे हे बीड जल्ह्यिातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.