प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय; मुंडेंना विरोध राहणारच : आ.धस
मुंबई । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाच दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर आमदार धस यांनी मुंंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे अशी प्रतिक्रिया देत प्रकृतीची विचारपूस केली असली तरी धनंजय मुंडे यांना विरोध राहणारच असेही धस म्हणाले.
या भेटी नंतर आ.धस म्हणाले की मी त्यांना दिवसा त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची विचारपूस आणि लढा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, त्यात गैर काय? असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे भेटीत काही गैर नसल्याचं धस यांनी म्हटलं आहे.