धस,मुंडे म्हणजे जय आणि वीरुची जोडी : शेख महेबुब
बीड । प्रतिनिधी
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वत्र टिकेची झोड उडत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी धस, मुंडे म्हणजे जय आिण वीरुची जोडी आहे असे म्हणत टोला लगावला आहे.
बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सोनवणेंसह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती.त्यात ते बोलत होते. शेख महेबुब म्हणाले की, धस मुंडे यांचा दोस्ताना जुना आहे. म्हणून या भेटीत काही नवल नाही. यापूर्वीही या जय, वीरुच्या जोडीचा प्रत्यय आला आहे. या दोघांची भेट व्हॅलेंटाईनला झाली का कधी झाली हे माहिती नाही.दोन समाजात तेढ निर्माण करायचे आणि पुन्हा भेट घ्यायची असे हे धोरण आहे.देशमुख यांच्या खून प्रकरणात धस, पवार आणि नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री यांना विनंती केली पाहिजे होती की मुंडे यांचा राजीनामा घ्या म्हणून..या सर्व प्रकारात अभिमन्यू पवार, सुरेश धस, नरेंद्र पाटील हे कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलत आहेत.. त्यांचा आका कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.