व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी आता द्यावे लागणार ही दोन महत्वाची कागदपत्रे

0

मुंबई । प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर आता शासनाने या योजनेची प्राप्तीकर विभागाकडून पडताळणी सुरु केली आहे. यातून अपात्र बहिणींना योजनेतून वेगळण्यात येणार आहे. दरम्यान आता महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी द्यावे लागणार आहेत. तसेच हयातीचा दाखला जमा करावा लागणार आहे. हे दोन्ही कागदपत्रे दरवर्षी नव्याने दाखल केल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. योजनेसाठी राज्यातील तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहि‍णींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. दरम्यान आता सरकारने या योजनेची पडताळणी सुरु केली आहे. यातून अपात्र बहिणींना योजनेतू वगळण्यात येत आहे. सरकारने गेल्याच आठवड्यात 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते. संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचाही लाभ घेत असलेल्या 2.3 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनच लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.