सुप्रिया सुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर; देशमुख, मुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार
बीड । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या उद्या मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या मस्साजोग येथील स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. नंतर परळी येथील स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंिबयांचीही भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदी उपस्थित राहणार आहेत.