शेतकऱ्यांना मावेजा मिळाला नाही; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त
बीड । प्रतिनिधी
चिखलबीड (ता.वडवणी) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लघु सिंचन प्रकल्पासाठी संपादीत केल्या होत्या. याबदल्यात शेतकऱ्यांना मिळालेला मावेजा तुंटपंुजा असल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी माजलगाव न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर आज गाडी जप्त करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मावेजाची रक्कम लवकरच मिळाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालया देऊ शकते असे वकिलांनी सांगितले.
चिखल बीड येथे 1998 साली लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी गावातील तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या होत्या. याबदल्यात समाधानकारक मावेजा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाने शेतकऱ्यांना 32 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरीही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. यामध्ये नऊ वर्षांचा कालावधी लोटला. अखेर शेतकऱ्यांनी माजलगाव न्यायालयात धाव घेतली आिण शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्तीचे आदेश दिले.