एसपी नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, दीडशे आरोपींना दिला दम
बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यातील एक नव्हे तर तब्बल हत्येचा प्रयत्न दीडशे आरोपींना एसपी नवनीत कॉवत यांनी कडक शब्दात समज दिली. पुन्हा गुन्हे करु नका अन्यथा कडक कारवाईला समोरे जावे लागेल असा इशारा एसपी कॉवत यांनी दिला. दरम्यान काही दिवसांपूर्वी वाळू माफीयांना एका रांगेत उभा करुन कॉवत यांनी समज दिली होती. आजच्या घटनेवरुन एसपी नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येते.
एसपी नवनीत कॉवत यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांना तंबी दिली होती. त्यानंतर कुख्यात गुन्हेगारांनाही त्यांनी दम भरला होता. दरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालयात आज मंगळवारी कॉवत यांनी कलम 307 म्हणजेच हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना धडकी भरविली आहे.दुसऱ्यांदा गुन्हे करू नका, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी समज दिली.