कृषीमंत्री कोकाटेंना कोर्टाचा दणका; दोन वर्षांची शिक्षा सुनावली
मुंबई । प्रतिनिधी
राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अिजत पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा न्यायालयाने दणका दिला आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
1995 ते 1997 च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळल्या होत्या. यावेळी आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. या प्रकरणी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता तसेच या प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हाही नोंद झाला होता. आज नाशिक न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 1997 पासून सुरु असून आज त्याचा निकाल लागला.