व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

35 लाख द्या आणि खून करा अशी परळीतील परिस्थिती : आ. धस

0

परळी । प्रतिनिधी
महादेव मुंडे यांच्या हत्येला आज 15 महिने झाले तरीही हत्येचा तपास उलगडत नाही. पोलीस तपासाला आहेत का कशाला? परळीत या 35 लाख द्या आणि खून करा अशी परिस्थिती आहे असे आमदार सुरेश धस म्हणाले.

भाजप आमदार सुरेश धस आज परळीत असून त्यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे यांचं कुटुंब चांगलंच भावुक झालं. आ.धस म्हणाले की, आकाच्या लोकांनी हा प्लॉट घेतला आहे, नेमका त्यांचा यात हात आहे का? कमहादेव मुंडे यांचा प्लॉट ज्यांनी घेतला तो प्लॉट नंतर कोणाच्या नावावर झाला हे पाहावे लागेल. या प्रकरणात चार पाच पोलिसांची नावे समोर येत आहेत. भास्कर केंद्रे 15 वर्षे, सचिन सानप हे 10 वर्ष झाले इथेच आहेत. परळीतील पोलिसांनी खून झाल्यावर गाडी नेली पण बॉडी तिथेच ठेवली. याचा अर्थ पोलिसांनीच त्यांना मारले कां?, असा सवाल सुरेश धस यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 100 टक्के यात आकाचा संबंध आहे, किंवा मग पोलिसांनीच याला मारले. रात्री 8 वाजता कोर्टासमोर महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. या प्रकरणात आकाच्या आकाचा हात नसेल मात्र आकाचा हात नक्की असेल. असं म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.