व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कोकणात समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

0

मुंबई । प्रतिनिधी
कोकणातील तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) हे मयत झालेले असून ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे.

तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर आज काही पर्यटक आनंद घेण्यासाठी गेले होते. त्यात पाच जणांचा समावेश होता. यावेळी स्थानिक नागरीकांनी खोल समुद्रात जाऊ नका अशी सूचना वारंवार या पर्यटकांना केली. मात्र पाचही जण आंघोळीसाठी समुद्रात गेले.पाच पैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.