व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शक्तिकांत दास यांच्याकडे मोदींच्या प्रधान सचिवाची जबाबदारी

0

बीड । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त गव्हर्नर आहेत. 2019 पासून पी के मिश्रा हे मोदींचे प्रधान सचिव म्हण्ून काम पहात आहेत. आता त्यांच्या सोबत दास हे देखील काम पाहणार आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यानंतर शक्तीकांत दास यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शक्तिकांत दास आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून काम करतील. तशा आशयाचा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे प्रधान सचिव असतील. 2019 सालापासून पी के मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून काम करत असून त्यांच्यासोबतीला शक्तिकांत दासही काम करतील. RBI गव्हर्नर म्हणून सहा वर्षे सेवा केल्यानंतर शक्तिकांत दास डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले. आता प्रधान सचिव या नात्याने ते पंतप्रधानांना प्रमुख आर्थिक धोरणात्मक सल्ला देण्याची भूमिका बजावतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.