व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

खातेदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे,पुर्णवादीचे वटवृक्षात रूपांतर;पुढच्या तीन वर्षांत २४०० कोटींचे उद्दिष्ट पुर्ण करणार-डॉ.सुभाष जोशी

पुर्णवादी नागरी सहकारी बॅकेचा आष्टीमध्ये ग्राहक मेळावा संपन्न

0

आष्टी click2ashti-आष्टी-साधारण दोन वर्षापुर्वी आम्ही बॅकेचा कारभार स्विकारला सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवत आमच्या हातात बिनविरोध दिला आहे.आमच्या शाखेत आष्टीकरांनी विश्वास दाखवत जवळपास 67 कोटी रूपायांच्या ठेवी ठेवल्यात ह्या लोकांनी खातेदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे ह्या शाखेचे वटवृक्षात रुपांतर झाले,तसेच आम्ही येणा-या तीन वर्षांत जवळपास २ हजार ४०० कोटींच्या ठेवी आम्ही उद्दीष्ट पुर्ण करणार असल्याचे प्रतिपादन पुर्णवादीचे अध्यक्ष डॉ.सुभाष जोशी यांनी केले.

आष्टी येथील पुर्णवादी नागरी सहकारी बँक शाखा-आष्टीचा आज शनिवार दि.1 रोजी सायंकाळी 6 वा.ग्राहक मेळावा संपन्न झाला.यावेळी बॅकेचे अध्यक्ष डॉ.सुभाष जोशी हे बोलत होते.याप्रसंगी बॅकेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर,अमित देशपांडे,संचालक भालेराव,बॅकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवराव राजूरकर,स्थानिक सल्लागार सुनिल मेहेर, डॉ.गुंडूनाना कुलकर्णी यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजूरकर करतांना म्हणाले,पुर्ण वादी नागरी बॅकेने पहिली शाखा हि 31 वर्षापुर्वी सुरु केली.या शाखेत जवळपास 15 हजार खातेदार असून,63 कोटी रुपायांच्या ठेवी आणि करंट खाते हे 400 पेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगत बॅकेचा लेखाजोखा ग्राहकांना सांगितला.यावेळी मान्यवर व आष्टी शहरातील नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आष्टी-येथील पुर्णवादी नागरी सहकारी बॅकेंच्या ग्राहक मेळाव्यात आष्टी येथील व्यापारी सुखलाल मुथ्था मनोगत व्यक्त करतांना दिसत आहेत.

यावेळी शाखाधिकारी संतोष माळवदे यांनी बॅकेतील कर्मचारी तसेच त्यांच्या कामाच्या पध्दती याची माहिती देण्यात आली. तसेच बँकेची लॉकर सुविधा आणि त्याचे देयक, कर्ज सुविधा, पीक कर्ज याबाबतही माहिती देत उपस्थित ग्राहकांचे स्वागत केले.यावेळी संजय मेहेर,इंजि.दत्तात्रय देशमुख,सुखलाल मुथ्था, डॉ.मधुकर हंबर्डे,पत्रकार परिषद बीडचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे,तालुका अध्यक्ष प्रविण पोकळे,नामदेव राऊत,गणेश लाहोटी, नवनीत कटारिया,शरद रेडेकर,गणेश दळवी यांच्यासह व्यापारी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.