व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या कर्जदारास तीन महिने कारावास,सात लाखांचा दंड

आष्टी न्यायालयाचा निकाल;धनादेश न वटल्या प्रकरणी शिक्षा

0

आष्टी click2ashti-धनादेश न वटल्या प्रकरणी आष्टी शहरातील पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेचा कर्जदार राजाभाऊ आसाराम धनवडे (रा.आष्टी) यास आष्टी न्ययालयाने तीन महिने कारावास व सात लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची अधिक माहिती अशी की,आरोपी राजाभाऊ आसाराम धनवडे (रा. आष्टी) याने घरबांधणीसाठी आष्टी शहरातील पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.या कर्जाची नियमित परतफेड आरोपीने केली नाही. थकबाकी वसुलीसाठी पतसंस्थेचे कर्मचारी गेले असता आरोपीने थकित रकमेपोटी ६ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश पतसंस्थेस दिला.हा धनादेश न वटल्याने पतसंंस्थेने त्याच्याविरुद्ध आष्टी न्यायालयात धनादेश अनादराचा खटला दाखल केला.यात उपलब्ध कागदपत्रे व पतसंस्थेचे व्यवस्थापक गोवर्धन केरूळकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
काल,दि. १ एप्रिल रोजी न्यायाधीश एम.के.पाटील यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन उपलब्ध कागदपत्रे व लेखी व तोंडी पुरावे ग्राह्य धरून धनादेश अनादर प्रकरणी आरोपी राजाभाऊ धनवडे यास न्यायालयाने दोषी ठरवले.या खटल्यात न्यायालयाने आरोपी राजाभाऊ धनवडे यास तीन महिने कारावास व थकित रकमेच्या भरण्यापोटी ७ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने
अँड.बी.डी.एकशिंगे यांनी काम पाहिले.त्यांना अँड.संदीप ढोबळे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.