विजेचा शॉक बसून तरुणाचा मृत्यू;आष्टी तालुक्यातील हनुमंत गाव येथील घटना
आष्टी click2ashti-रात्री ११ च्या सुमारास झाडांना पाणि देऊन बोअर ची मोटार बंद करण्यास गेला असता विजेचा शॉक बसून अमोल पंढरीनाथ पारखे (वय ३०)यांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत आष्टी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील हनुमंत गाव येथील अॅड.अमोल पारखे हे रात्री ११ च्या सुमारास आपल्या घरासमोरील झाडांना पाणि देत होते.झाडांना पाणि देऊन झाल्यावर बोअर बंद करण्यासाठी गेले असता त्यांचा हात स्टार्टर मधील उघड्या वायरला लागल्याने त्यांना विजेचा शॉक बसला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.यावेळी वडील पंढरीनाथ पारखे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही विजेचा शॉक बसून बाजूला फेकले गेले.मयत अमोल पारखे हे आष्टी न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ अॅड.पंढरीनाथ पारखे यांचे चिरंजीव असुन,अमोल पारखे हे ही आष्टी न्यायालयात वडिलांबरोबर वकीली करत होते.अमोल यांच्या जाण्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.मयत अमोल यांचा मृत्युदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असुन, त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मुळगावी हनुमंत गाव येथे सकाळी ११.३० वा.करण्यात येणार आहेत.मयत अमोल यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी व दहा महिन्याचा मुलगा आहे.