आष्टी मतदार संघातील अवैध सावकारी मोडीत काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार-माजी आ.धोंडे
आष्टी click2ashti-मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध सावकारीने अनेकांचे जीव घेऊन, कुटूंब उघड्यावर पडले आहेत.या सावकारीला आळा घालण्यासाठी आपण स्वतः एसपींना भेटलो असून,त्यांनी योग्य कारवाई आठ दिवसांत केली नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून ही अवैध सावकारकी मोडीत काढणार असल्याचे प्रतिपादन माजी आ.भिमराव धोंडे यांनी केले आहे.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात रविवार (दि.१)रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार भिमराव धोंडे बोलत होते.पुढे बोलतांना धोंडे म्हणाले,खाजगी सावकारकीने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.दोन दिवसांपुर्वी पाटोदा शहरातील व्यापारी संजय कांकरीया यांनी सावकाराला घेतलेल्या पैशाचे पाच पट पैसे दिले तरी अजूनही पैशांची मागणी करतात.वेळ प्रसंगी हे खाजगी सावकार बाईला सुध्दा अंगावर घालतात.आशा या सावकारीला आळा घालावा जर या सावकारांचे पैसे देऊनही जर हे सावकार पैसे मागत असतील तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा आपण स्वतः एसपी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मतदार संघातील अवैध सावकारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.