वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला;सुदैवाने जीवीतहानी टळली
क्लिक2आष्टी आपडेट-चंद्रपूर शहरात रविवारी रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुटला.वाऱ्याचा वेग एवढा भीषण होता की, रस्त्यावर सुरू असलेली वाहतूकही काही काळ थांबली होती. तसेच, या वाऱ्यामुळे 121 फूट उंच असलेला मोबाईल टॉवरही खाली कोसळला.
शहरातील ठाकरे उड्डाणपुलाखाली अनेक नागरिकांनी वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आसरा घेतला होता. या वादळी वाऱ्याने शहरातील विद्युत पुरवठा 3 तासाहून अधिक वेळ खंडित झाला होता. या वादळी वाऱ्याने शहरात तब्बल 2 तास धुमाकूळ घातला.
जोरदार वाऱ्यामुळे शहरातील गायत्री नगर, वडगाव प्रभागात असलेला मोबाईल टॉवर खाली कोसळला. 121 फूट उंच असलेला हा टॉवर बाजूला राहणाऱ्या श्रीनाथ चुंद्री यांच्या घरावर कोसळला.सुदैवाने घरी कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, हा मोबाईल टॉवर कुणाच्या अंगावर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.