समाजात बदनामीच्या भितीने बापाने मुलीच्या मैञीणीचा केला खून;पाच जणांवर गुन्हा दाखल
क्लिक2आष्टी अपडेट-स्वत:ची मुलगी व तिची मैत्रीण या दोघी गावातून पळून गेल्या.गावात याची माहिती पसरली तर समाजात बदनामी होईल, अशा भीतीने बापाने मुलीच्या मैत्रिणीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.पायल मच्छिंद्र जाधव (१३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी बापासह ५ जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,जालना जिल्ह्यातील
शंभू सावरगाव शिवारातील एका विहिरीत १६ एप्रिल रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला.आरोपींत पळून गेलेल्या विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.मृत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री १२.३० वाजता घराबाहेर पडलेल्या दोन मुलींना भेटण्यासाठी शिवनी येथील तीन मुले आली होती.त्यांच्यात वादही झाला होता.मुले येत नसल्यामुळे दोन्ही मुलींपैकी एका मुलीने शंभू महादेव येथील एका महाराजाच्या मोबाइलवरून फोन लावत मुलांना बोलावले.जालिंदर लक्ष्मण राठोड (शंभू सावरगाव), जीवन मोहन चव्हाण, युवराज राम राठोड (राठोडनगर), अनिल सुरेश राठोड (डांबरी) यांच्यासह आपल्या मुलीची अल्पवयीन मैत्रीण यांनी बदनामीला घाबरून मुलीचा खून करत मृतदेह विहिरीत टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आता या प्रकरणातील तीन मुले पोलिसांच्या रडारवर आहेत.