“हिंदु” मिञाशी बोलू नको म्हणत भररस्तात”मुस्लिम”तरूणीला मारहाण
क्लिक2आष्टी अपडेट-दुसऱ्या धर्मातील मुलांशी बोलत असल्याचे आढळल्याने काही समाजकंटकांनी एका तरुणीला भररस्त्यात मारहाण केली.त्याचबरोबर तिचा स्कार्फ ओढून तीन ते चार जणांनी बॅग ओढत शिवीगाळ केली.त्याची मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून व्हिडिओ व्हायरल केला.तीन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून फिर्यादी होत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी मूळ शिर्डीची असलेली १८ वर्षीय करिश्मा (नाव काल्पनिक आहे) शिक्षणानिमित्त छञपती संभाजीनगर शहरात वास्तव्यास आहे.ती विज्ञान शाखेत शिकत असून सध्या खासगी क्लासेसदेखील करते. क्लासवरून ती दुपारी दोनच्या सुमारास तिच्या दोन मित्रांसह टाऊन हॉल परिसरातून आसेफिया कॉलनीकडे जात होती.काही टवाळखोरांची नजर त्या तिघांवर पडली.त्यांनी तत्काळ त्यांच्याकडे धाव घेत काही कळायच्या आत त्या दोन मुलांवर हल्ला चढवला.पाहता पाहता बघ्याची गर्दी जमा झाली.
त्यानंतर मुलीला पकडून,’तू हिंदू मुलांसोबत का बोलते, का फिरतेय,’ असे म्हणत त्यांनी तिला मारहाणीस सुरुवात केली.तिच्या मित्रांना गांभीर्य कळताच त्यांनी तत्काळ पळ काढला,असे पोलिसांनी सांगितले. टवाळखोरांनी तिच्या अंगावर धावून जात तिचा स्कार्फ ओढला.तिला मारहाण करत पाठलाग सुरू केला.तीन ते चार तरुणांनी तिचा व्हिडिओ चित्रित केला व त्या पोरांना शोधा, हिच्या कुटुंबीयांना सांगा, हिचा व्हिडिओ काढा, असे म्हणत धमकावणे सुरू केले.करिश्माने आरडाओरड सुरू केली.काही तरुणांच्या अंगावर जात तिने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.दोघांनी तिच्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार स्थानिक नागरिक, व्यवसायिक, हातगाडी चालक फक्त पाहत होते.घटनेची माहिती कळताच ११२ वरील अंमलदार प्रवीण बोदवडे, प्रकाश मानवते यांनी धाव घेतली. तोपर्यंत मुलगी एका घरात बसलेली होती.त्यांनी तिच्याकडे जात महिला पोलिसांना बोलावून घेतले. छाया शिरसे, मुरकूटे यांनी तिला धीर देत ठाण्यात नेले. त्यानंतर सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांन तत्काळ तिच्या कुटुंबीयांना बोलावून घेतले.त्यांनी त्यांना मदतीचे आश्वासन देत तक्रार देण्यास सांगितले.मात्र,तिच्या आईने स्पष्ट नकार देत तक्रार द्यायची नसल्याचे पोलिसांना लिहून दिले.मंगळवारी रात्री मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. समाजाच्या विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त सुरू झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात पुन्हा कुटुंबाला तक्रार देण्यास विनंती केली. मात्र, कुटुंबाने बोलण्यास नकार दिला.त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. तोपर्यंत उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गीता बागवडे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यात उस्मानपुऱ्याचा शेख गयाज ऊर्फ बब्बू शेख रियाज (३०) याला अटक करत बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या चौकशीतून नदिम खान फिरोज खान (२१, रा. बेगमपुरा), सुफियान खान मुसा खान (२१, रा. आसिफिया कॉलनी) यांचे नाव समोर येताच त्यांनाही अटक करण्यात आली. भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ३९३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत इतरांचा शोध सुरू होता.सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे अधिक तपास करत आहेत.