व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अतिक-अश्रफ यांना घेऊन जाणारे वाहन थेट रुग्णालयात का नेले नाही?-सर्वोच्च न्यायालय

0

क्लिक2आष्टी अपडेट-सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अतिक-अश्रफ हत्याकांडाप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.न्यायालयाने या हत्याकांचा विस्तृत अहवाल मागवला आहे.’त्या दिवशी नेमके काय घडले? आतापर्यंतच्या तपासात किती प्रगती झाली? हे सरकारने सांगावे,’असे कोर्टाने म्हटले आहे. याशिवाय 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपींच्या एन्काऊंटरचा अहवालही कोर्टाने मागवला आहे.
‘अतिक-अश्रफ यांना घेऊन जाणारे वाहन थेट रुग्णालयात का नेले नाही? त्यांना रुग्णालयात नेले जात असल्याची खबर मारेकऱ्यांना कशी मिळाली,’अशा प्रश्नांची सरबत्तीही न्यायालयाने या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारवर केली. या प्रकरणी आता 3 आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.अतिक-अश्रफ यांची 15 एप्रिल रोजी रात्री 10:35 वा. प्रयागराजच्या कोल्विन रुग्णालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लवलेश तिवारी, सनी सिंग व अरुण मौर्य या शूटर्सनी हत्येनंतर लगेचच आत्मसमर्पण केले. उमेश पाल हत्येप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले आहे. यात अतिकचा मुलगा असद, गुलाम, अरबाज व उस्मान चौधरीचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.