एका ईमानदार पत्रकाराला मिळाली जबरदस्त संधी: आष्टीच्या अविशांत कुमकर यांची व्हॉईस ऑफ मीडिया बीड जिल्हा डीजिटल मिडीया अध्यक्षपदी निवड
चर्चा तर होणारच ना l गणेश दळवी आष्टी
क्लिक2आष्टी अपडेट-बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सारख्या खेडया गावातून आष्टीला शिक्षण घेत असताना युवक पत्रकार अविशांत कुमकर यांनी मोठ्या कष्टातून ईमानदारीने पत्रकारीता केली.कुणाच्या अध्यात ना मध्यात बातमी एक बातमी करत आपलं काम सुरू ठेवल पत्रकारितेच्या वीस वर्षाचा तप केल्यामुळे आज डिजिटल मीडिया बीड विंग जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याचेच हे एक फलित आहे.नुकताच बीड येथे झालेल्या मराठवाडा स्तरीय अधिवेशनात त्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले निवडी बद्दल संपूर्ण जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील युवक पत्रकार अविशांत कुमकर यांनी आष्टी येथे चंपावतीपत्रचे प्रतिनिधी म्हणून २००३ साली उत्कृष्ट काम केले दैनिक बालाघाट आष्टी चित्र अशा वृत्तपत्रात काम केल्यामुळे २००७ साली या उत्कृष्ट कामगिरीची दखल म्हणून लोकमतचे तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाली तब्बल सात वर्ष लोकमतच्या माध्यमातून अनेक बातम्यांच्या माध्यमातून विविध विषय समोर आणले त्यामुळे लोकमतचे दोन राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले पुढे कुमकर यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियात पदार्पण केले मी मराठी न्यूज चॅनलला बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून २०१४ ते २०१६ या तीन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील अनेक बातम्या फोकस केल्यामुळे कुमकर यांचे राज्यभरात नाव झाले.एवढेच नव्हे तर अविशांत कुमकर यांनी महाराष्ट्रात प्रथमच असा व्हाट्सअपवाणी नावाने रेडिओ सारखे ऑडिओ बुलेटीन म्हणजे बातमीपत्र सुरू केले.आज अविशांत कुमकर यांनी स्वतःचे आज मराठी नावाने युट्युब चॅनेल व्हिडिओ ऑडिओ,टेक्स स्वरूपात सुरू असून लाखो प्रेक्षक त्यांच्या डिजिटल माध्यमातून माहिती मिळवत आहेत कुमकर यांची विशेष बाब म्हणजे ते खोखो खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत क्रिकेटचे ही उत्कृष्ट खेळाडू आहेत ऑनलाइनच्या माध्यमातून ते सकाळी सहा ते सात वर्कआउटचे म्हणजे व्यायामचे क्लासेसही मोफत घेत आहेत.आशा उपक्रमशील युवक पत्रकार अविशांत कुमकर यांची नुकतीच बीड येथे मराठवाडा स्तरीय अधिवेशन पार पडले यात व्हॉईस ऑफ मीडिया बीड जिल्हा डीजिटल मिडीया अध्यक्षपदी निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे राज्याध्यक्ष विलास बडे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे,दिनेश लिंबेकर,संजय मालानी,शुभम खाडे आदी मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आले.