प्राॅपर्टी साठी आष्टी तालुक्यात अजबच प्रकार;मयत बापाला केले चक्क जिवंत..!
दुय्यम निबंधकाने केला आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल
क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील लिंबोडी येथील मयत कारभारी आंधळे यांची असलेली जमिन चक्क पोराने मयत बापाला जिंवत दाखवून जमिन विकल्याचा प्रकार घडला असून,या प्रकरणी आष्टी येथील दुय्यम निंबधक यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांत मुलासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील कारभारी आंधळे यांचा मृत्यू दि.१२/४/२०१४ रोजी झाला.त्यांचा मुलगा नारायण कारभारी आंधळे याने मयत वडिलांच्या मतदान ओळखपञावर स्वत;चा फोटो लावून ओळखपञ बनवुन वडिलांच्या नावाचा वापर करत त्यांच्या नावे असलेली जमिन दुय्यम निंबधक कार्यालय आष्टी येथे दस्त क्रं.६५७/२०१५ दि.११/३/२०१५,दस्त क्रं.६६७/२०१५ दि.११/३/२०१५,दस्त क्रं.२११२/२०१६ दि.२१/७/२०१६ असे खोटे दस्त बनवून आंबादास पांडूरंग आंधळे,जिजाबा निवृत्ती गर्जे,बाबासाहेब देवराम आंधळे रा.सर्व लिंबोडी यांना विक्री केली.तर या खरेदीस साक्षीदार असलेले राजू काशीनाथ आंधळे(रा.कडा),आप्पादेव सुभाषराव आंधळे,अजिनाथ सुभाषराव आंधळे (रा.लिंबोडी)यांच्यावर आष्टी येथील दुय्यम निंबधक घनशाम कृष्णा खेडसकर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांत दि.३/५/२०२३ रोजी गुरंन ११८/२०२३ कलम ४२०,४६४,४६५,४६७,४६८,३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख हे करत आहेत.