भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी माजी आ.भीमराव धोंडे यांची निवड;आष्टी मतदार संघात जल्लोष
क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या चार दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रमाणिकपणे कार्यरत असलेले माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नुकतीच निवड केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यांमधील विविध जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देत आणि पक्ष वाढीसाठी राज्य कार्यकारिणी वर विविध नियुक्त्या केल्या आहेत.त्यात बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आजपर्यंतच्या प्रमाणिक सेवा कार्याची दखल घेत भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी निवड करून सन्मान दिला आहे.त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी अनुकूल वातावरण वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान या निवड व बहुमानाबद्दल आष्टी तालुका भाजपाच्यावतीने भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव मस्के,रत्नदीप निकाळजे,अशोक साळवे,राम बिरंगळ,मोहन खेडकर,अशोक निकाळजे,नवनाथ सानप,अभय गर्जे,शंकर देशमुख,उत्तम बोडखे,सदाशिव दिंडे,आण्णासाहेब लांबडे,रघुनाथ शिंदे,बाबु कदम,बबन कदम,अतुल मुळे आदी मान्यवरांसह विविध कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी नूतन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा आष्टी,पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत यथोचित सत्कार केला.
प्रमाणिक नेतृत्वाला मोठी संधी !
नुकत्याच झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्याच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील लोकप्रिय माजी आ.अभ्यासू नेतृत्व शांत संयमी आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व यांच्या बहुआयामी संघटन कौशल्याच्या फायदा भारतीय जनता पार्टीच्या तळागाळापर्यंतच्या लोकप्रियतेला पोषक ठरेल या हेतूने केलेली निवड रास्त असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या अभिनंदन आणि शुभेच्छा पर मनोगतात व्यक्त केल्या.
पक्ष वाढीसाठी जोमाने प्रयत्न करणार-माजी आ.धोंडे
भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांच्यावतीने आज करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,भाजपा हा सर्वसामान्यांच्या गोरगरीब शेतकरी आणि युवकांच्यासाठी जनहिताची काम करणारा पक्ष आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,लोकनेत्या पंकजाताई मुंडे आदि सर्व नेत्यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरविणार असल्याचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.