पुन्हा”मुंडे”बहिण भावामध्ये लढत ! वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहिर;आज पासून अर्ज भरण्यास सुरूवात
बिगूल वाजला
क्लिक2आष्टी अपडेट-भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आज दि.१० मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.११ जून रोजी मतदान होईल तर १२ जूनला कारखान्यावर कोणाची सत्ता येणार याचा निकाल हाती येईल या कारखान्यावर भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे मात्र यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे हे देखील कारखाना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्ताने दोघाबहीण भावात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर करखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.कारखान्याच्या २१ संचालक पदासाठी ही निवडणूक होणार आहे.१० मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून १६ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.१७ मे रोजी छाननी होईल तर १८ मे ते १ जूनपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.२ जून रोजी चिन्ह वाटप होईल तर ११ जून रोजी मतदान आणि १२ जून रोजी मतमोजणी होईल.या निवडणुकीत यावेळी आ.धनंजय मुंडे हे देखील पॅनल टाकण्याची शक्यता आहे.कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव हे काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत.