व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मोबाईल ने संपविले नवरा-बायकोचे जीवन;शेतातच घेतला दोघांनी गळफास

आष्टी तालुक्यातील वाघळूंज येथील घटना

0

क्लिक2आष्टी अपडेट-फोनवर बोलण्यावरून वाद झाल्यानंतर पत्नी सायंकाळी रागाच्या भरात शेतात निघून गेली.तिच्यापाठोपाठ पती शेतात गेला.रात्री उशीर झाला तरी दोघे घरी न परतल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता सुरुवातीला पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर बुधवारी सकाळी पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.ईश्वर ऊर्फ बंडू बबन गुंड (३४) याने ऋतुजा (२४, रा.वाघळूज,ता.आष्टी ) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी दीड वाजता दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.याप्रकरणी अंभोरा पोलिस दोघांच्या कुटुंबीयांचे जवाब घेणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील ईश्वर ऊर्फ बंडू बबन गुंड (३४) याने ऋतुजा (२४) या मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता.विवाहानंतर दोघे मुंबईला रोजीरोटीसाठी गेले होते. मुंबईत ईश्वर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.पत्नी ऋतुजा गरोदर असल्याने चार महिन्यांपूर्वी दोघे गावी आले होते.गावी आल्यानंतर ऋतुजाला एक मुलगी झाली.गावातील मारुती मंदिराजवळ पाच एकर शेती पती-पत्नी करत होते.फोनवरून बोलण्यावरून मंगळवारी संध्याकाळी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर सुरुवातीला ऋतुजा रागाच्या भरात शेतात निघून गेली होती.रात्र झाली तरी दोघे घरी न परतल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांच्या शेतात धाव घेतली.मंगळवारी रात्री दहा वाजता ईश्वर बबन गुंड यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता.त्यानंतर कुटुंबीयांनी ऋतुजा गुंड हिचा शोध सुरू केला.दरम्यान, बुधवारी सकाळी सात वाजता शोध सुरू केला असता दुसऱ्याच्या शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
तीन महिन्याची चिमकुली उघड्यावर
ऋतुजा हिचे आई-वडील वाघळूंज येथे मोलमजूरी करत असून,तिला एक भाऊ आहे.तर ईश्वरला आई-वडील मोठा भाऊ व एक बहिण आहे.ईश्वर आणि ऋतुजा यांच्या आत्महत्येमुळे तीन महिन्यांची चिमकुली उघड्यावर पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.