व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

ठरलं;आता “अहमदनगर” नाही तर “अहिल्यानगर”

राज्य सरकारने अहमदनगर नामकरणाला दिला ग्रीन सिग्नल

0

क्लिक2आष्टी अपडेट-अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला आहे. दरम्यान,आज दि.३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली.कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा,अशी मागणी केली होती.त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दर्शवला आहे.आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच,असं देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सागितलं आहे.त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अहिल्यानगर नामांतरावर भाष्य करत करत अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरुन राज्य सरकारकडूनही अहिल्यानगर नामांतराला मंजुरी मिळणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले,आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीच छत्रपतींचा मावळाच मुख्यमंत्री म्हणूनच अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केलं तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण केलं आहे. त्यामुळे आता अहमदनगरचेही नाव अहिल्यानगर होणारच असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.